Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, शाळेतल्या वायरमनला अटक

Delhi news
दिल्लीत एका सहा वर्षांच्या मुलीवर तिच्या शाळेतील वायरमनने बलात्कार केला आहे. पीडित मुलीने तिच्यासोबत झालेल्या छळाची माहिती कुटुंबीयांना देताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
 
या घटनेत पीडित मुलगी इयत्ता दुसरीमध्ये शिकत असून आरोपीने तिला फूस लावून पळवलं आणि शाळा परिसरातील गोल मार्केट येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपी हा तिच्या शाळेत वायरमननचे काम करतो. बुधवारी रात्री पीडित मुलीची तब्येत अचानक खराब झाल्यावर तिच्या कुटुंबीयांनी तिच्याकडे विचारपूस केली. त्यानंतर तिने झालेल्या प्रकाराबद्दल सर्व हकिकत कुटुंबीयांनी सांगितली. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला आणि त्या आधारावर आरोपीला अटक केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एसबीआयला पहिल्या तिमाहीत तोटा