Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्ली : २० वर्षे जुनी ४ मजली इमारत कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू

दिल्ली : २० वर्षे जुनी ४ मजली इमारत कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू
, शनिवार, 19 एप्रिल 2025 (18:26 IST)
Delhi News: शनिवारी पहाटे ईशान्य दिल्लीतील शक्ती विहार भागात एक बहुमजली निवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. 
मिळालेल्या माहितनुसार राष्ट्रीय राजधानीतील मुस्तफाबाद परिसरात पहाटे ३ वाजताच्या सुमारास कोसळलेल्या २० वर्षे जुन्या चार मजली इमारतीच्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन सेवा, दिल्ली पोलिस आणि इतर बचाव कर्मचाऱ्यांच्या पथकांनी १२ तासांहून अधिक काळ बचाव कार्य केले.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, इमारतीच्या तळमजल्यावरील "दोन-तीन दुकानांमध्ये" बांधकाम सुरू असल्याने इमारत कोसळली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी इमारत कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे आणि घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. स्थानिकांनी सांगितले की, नवीन दुकानाच्या बांधकामामुळे इमारत कोसळली. त्यांनी इतर चार ते पाच इमारतींच्या गंभीर स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.“गेल्या काही वर्षांपासून इमारतींच्या भिंतींमध्ये गटारांचे पाणी शिरत आहे,” असे दुसरे रहिवासी सलीम अली म्हणाले. ओलाव्यामुळे भिंतींमध्ये भेगा पडल्या आहे. दिल्ली महानगरपालिकेने (एमसीडी) एका निवेदनात म्हटले आहे की ही इमारत सुमारे २० वर्षे जुनी होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

८ मे रोजी मुंबई विमानतळावरील विमान सेवा सहा तासांसाठी बंद राहणार