Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, अनेकांचा मृत्यू

Webdunia
रविवार, 25 फेब्रुवारी 2024 (15:42 IST)
उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागली आहे. फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय कारखान्यात अनेक लोक अडकले आहेत.
 
अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवत असून बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
 
ही घटना कौशांबी जिल्ह्यातील कोखराज पोलीस स्टेशन हद्दीतील भरवारी शहरात घडली. भारवारी शहरातील वॉर्ड क्रमांक 23 मध्ये वस्तीपासून दूर फटाक्यांचा कारखाना चालत असे. कारखान्याचा परवाना वैध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी सकाळी कारखान्यात कामगार काम करत असताना साडेअकराच्या सुमारास अचानक स्फोट झाला. स्फोटाचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक हादरले. स्फोटाचा आवाज दोन ते तीन किलोमीटरहून अधिक दूरपर्यंत ऐकू आला.

स्फोटानंतर कारखान्यात काम करणारे कामगार जळून खाक झाले. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे जवान आग विझवत आहेत तसेच बचाव कार्यही करत आहेत.
 
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. एसपी म्हणाले की, चार जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. इतर अनेकजण आत अडकल्याचेही वृत्त आहे. बचावकार्य सुरू आहे.

Edited By- Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments