Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तरुणाला 8 वर्षांपासून झाडाला ठेवलं बांधून, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

Find out the whole case by tying the young man to a tree for 8 years तरुणाला 8 वर्षांपासून झाडाला ठेवलं बांधून
, शुक्रवार, 27 मे 2022 (15:39 IST)
आजच्या धकाधकीच्या आणि धावणाऱ्या जीवनात कोणालाही कोणासाठी वेळ नाही. तिथे एका व्यक्तीने समाजातून निष्कासित केलेल्या तरुणाचे प्राण वाचवून आदर्श स्थापित केलं आहे. नितीन जानी यांनी या तरुणाचे प्राण वाचवले आहे. गुजरातमधील राजकोट येथे 22 वर्षीय तरुण (महेश) गेल्या आठ वर्षांपासून झाडाला बांधून आयुष्य जगत आहे. मात्र, आता त्याची सुटका होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रयत्नांमुळे महेशला लवकरच अभिमानाने आयुष्य जगण्याची संधी मिळू शकते. महेशला अच्छे दिन येणार असल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे.
 
महेश 22 वर्षांचा आहे. असे म्हणतात की, आठ वर्षांपूर्वी त्यांचे वागणे अत्यंत क्रूर झाले होते. तो इतरांशी उद्धटपणे वागू लागला. लोकांवर हल्ले करणे, दगडफेक करणे ही त्याची सवय झाली होती. यामुळे त्याचे वडील वैतागले होते. झोपडपट्टीत राहणाऱ्या महेशच्या कुटुंबीयांनी त्याला विवस्त्र अवस्थेत झाडाला बांधून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.
 
महेशचे वडील प्राग्जी ओलाकिया म्हणतात की त्यांचा मुलगा मानसिक आजारी आहे. यामुळे तो हिंसक बनतो. कोणीही त्याच्या जवळ आले की तो दगडफेक करू लागला. "आम्ही खूप गरीब आहोत आणि आमच्याकडे त्याच्यावर उपचार करण्यासाठी किंवा त्याला कुठेही ठेवण्यासाठी कोणतेही साधन नाही. म्हणून, आम्ही त्याला एका झाडाला बांधून ठेवले.
 
सोशल मीडियावर यूट्यूबवर खजुभाई या नावाने प्रसिद्ध असलेले कॉमेडियन नितीन जानी यांना नुकतीच या कुटुंबाची माहिती मिळाली. ते त्यांना भेटायला पोहोचले. जानी म्हणाले, “आम्ही गावाच्या सीमेवर कुटुंबासाठी घर बांधले आहे. वीज आणि पंखेही बसवले आहेत. महेशला अन्न आणि पाणीही देण्यात आले आहे. तो अजूनही हिंसक आहे. त्याच्यावर एक दोन दिवसात उपचार करायला नेणार आहे किंवा मानसशास्त्रज्ञाकडे घेऊन जाणार."
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हॉट्सअ‍ॅपवर मोठा धोका ! युजर्स ने या नंबरवर चुकूनही कॉल करू नका