Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खान सरांना अटक होणार?

khan sir
गोळीबाराच्या घटनेप्रकरणी बिहारचे शिक्षक खान सर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आत्मसमर्पण करण्यासाठी ते आज पाटणा न्यायालयात हजर झाले आहे.

बिहारचे प्रसिद्ध शिक्षक खान सर वादात सापडले आहे २ जून रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी कदमकुआं पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. एफआयआर दाखल झाल्यानंतर, बिहार पोलिसांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला आणि आज ते स्वतः आत्मसमर्पण करण्यासाठी पाटणा न्यायालयात हजर झाले आहे.
ALSO READ: अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार; कॉकरोच जनता पक्ष आंदोलनाला संजय राऊत यांचा जोरदार पाठिंबा
पाटणा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये खान सरांवर अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र आरोप ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. हे आरोप अजामीनपात्र श्रेणीत येतात, म्हणजेच या प्रकरणात त्यांना पोलीस ठाण्यातून जामीन मिळू शकत नाही. आरोपीला दिलासा मिळवण्यासाठी फक्त न्यायालयाकडे दाद मागावी लागते.

खान सरांना तुरुंगवास होईल का?
खान सरांना तुरुंगात टाकले जाईल की नाही, हे पूर्णपणे त्यांच्या जामीन अर्जावरील न्यायालयाच्या भूमिकेवर अवलंबून आहे. वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, खान सर गोळीबारात थेट सहभागी नव्हते आणि त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, हे जर न्यायालयाने मान्य केले, तर त्यांना जामीन मंजूर केला जाऊ शकतो.
ALSO READ: मामीने अल्पवयीन भाचीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, जेंडर चेंजचं ऑपरेशन फेल झाल्यावर सत्य आलं समोर
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

E85 इंधन देशात लॉन्च