Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांच्यासह दोघांविरुद्ध एफआयआर दाखल

suresh gopi
, सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 (19:01 IST)
केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्यावर त्रिशूर पूरम उत्सवात रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. गोपी यांनी निवडणूक प्रचारासाठी रुग्णांसाठी असलेल्या रुग्णवाहिकेचा वापर केल्याचा आरोप आहे, जे नियमांचे उल्लंघन आहे. 
 
मात्र, गोपीने हे आरोप फेटाळून लावत रुग्णवाहिकेचा वापर बचावासाठी केल्याचे सांगितले. त्यांच्यावर आयपीसीचे कलम 279 आणि 34 आणि मोटार वाहन कायद्याचे कलम 179, 184, 188 आणि 192 लावण्यात आल्या.
 
यावर्षी एप्रिलमध्ये त्रिशूर पूरम उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये रुग्णवाहिका वापरली जात होती. आता याप्रकरणी केंद्रीय मंत्री सुरेश गोपी आणि अन्य दोघां विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 
 
66 वर्षीय सुरेश गोपी केरळमधील अलाप्पुझा येथील रहिवासी आहेत. सुरेश गोपी यांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले असून ते पार्श्वगायकही आहेत. 
 
सुरेश गोपी यांनी दीर्घकाळ टीव्ही शो होस्टही केले आहेत. केरळमधील त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश गोपी यांनी दणदणीत विजय मिळवून इतिहास रचला होता.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रश्मी शुक्ला यांना डीजीपी पदावरून का हटवण्यात आले?जाणून घ्या