भारताविरोधात वारंवार आगळीक करीत असलेल्या चीनला आणखी एक धक्का देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून लीथियम खरेदीसाठी अर्जेंटिनासोबत करार करण्यात आला आहे. मोबाईल, लॅपटॉप, ई-व्हेईकल्स आदी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर होतो. देशात प्रथमच लिथियम आयन बॅटरी उत्पादित करण्याचे संशोधन पुण्यातील शास्त्रज्ञांनी केले आहे. या संशोधनाला उत्पादनात रूपांतरित करून स्वदेशी लिथियम आयन बॅटरीचे उत्पादन सुरु होणार असल्याने भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे, याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या अखत्यातिरील खनिज विदेश इंडिया लिमिटेडने लीथियम खरेदीसाठी अर्जेंटिनासोबत करार केला आहे. रिचार्जेबल बॅटर्या तयार करण्या साठी लीथियम वापरले जाते.
या बॅटरीची भारतात मोठी गरज आहे. त्यामुळे लघु व माध्यम उद्योगांनी पुढाकार घेऊन लिथियम बॅटरीच्या उत्पादनात उतरले पाहिजे. त्यांना उत्पादनासाठी लागणारे संशोधन, परीक्षण व अन्य सर्व प्रकारचे सहकार्य या सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारा केले जाणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात याचे उत्पादन सुरु झाले, तर भारताला चीनवर अवलंबून राहावे लागणार नाही.
विदेशातून लीथियम, कोबाल्ट तसेच इतर खनिजांची खरेदी करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील नाल्को, हिंदुस्थान कॉपर व मिनरल एक्स्प्लोरेशन लिमिटेड यांनी खनिज विदेशी इंडियाची ऑगस्ट 2019 मध्ये स्थापना केली होती. बोलव्हिया आणि इतर देशातूनही अशा खनिजांची खरेदी करता येते का, याची चाचपणी खनिज विदेश लि.कडून सुरू आहे. आगामी काळात इलेक्ट्रिक गाड्याच्या निर्मितीवर भर देण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यामुळे देशाला मोठ्या प्रमाणावर लीथियम लागणार आहे. सध्या केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चीनकडून लीथियमचा पुरवठा केला जातो.
सी-मेटच्या पुण्यातील केंद्रात ३५ हजार स्क्वेअर फूट परिसरात हा प्रकल्प उभारला जात असून, प्रायोगिक तत्वावर येथे बॅटरीचे उत्पादन सुरु होणार आहे. सेल, इलेक्ट्रोड व लागणाऱ्या अन्य गोष्टी पुरविण्यात येतील. ज्या कंपन्यांना या बॅटरीचे उत्पादन करायचे आहे, त्यांच्याशी सामंजस्य करार केला जाईल.
स्वदेशी बॅटरीचा फायदा काय?
वजनाला हलक्या आणि जास्त ऊर्जा देणार्या स्वदेशी बनावटीच्या या बॅटर्या सध्या उपलब्ध लिथियम आयन बॅटर्यांपेक्षा स्वस्त आहेत. धनाग्र आणि ऋणाग्रासाठी लागणारे सर्व पदार्थ येथे विकसित करण्यात आले आहे. वापरकर्त्या नागरिकांसह उद्योगांनाही फायदा होणार आहे. भविष्यात सोडियम आयन बॅटरीवरही काम शक्य होणार.