Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

भाजप नेते बाबुल सुप्रियो यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजप नेते बाबुल सुप्रियो यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
, शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (17:43 IST)
भाजप नेते बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. जुलै महिन्यात मोदी सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार केला होता. यावेळी इतर अनेक मंत्र्यांप्रमाणे पश्चिम बंगालचे बाबुल सुप्रियो यांनासुद्धा मंत्रीपदावरून काढून टाकण्यात आलं. पश्चिम बंगालमधील पक्षाच्या खराब कामगिरीमुळे ही कारवाई झाल्याचं मानलं गेलं.
 
मंत्रिमंडळातून काढून टाकल्यानंतर सुप्रियो यांनी खासदारकीचा राजीमाना दिला होता, तसंच आपण राजकीय संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. जुलै महिन्यात फेसबुक पोस्टद्वारे सुप्रियो यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
 
लवकरच लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देईन आणि सरकारी निवासस्थान सोडेन असं सुप्रियो यांनी म्हटलं होतं. त्यांनी लिहिलं होतं- "येतो, निरोप घेतो. आईवडील, पत्नी, मित्रपरिवार यांच्याशी चर्चा करून राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतो आहे". अन्य कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही असं सुप्रिया यांनी त्यावेळी म्हटलं होतं. मात्र आता त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अडीच वर्षांची मुलगी पाच दिवसांपासून मृतदेहासोबत राहत होती, 9 महिन्याच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील 5 जण मृतावस्थेत आढळले