देशाची राजधानी दिल्लीत सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राजधानी परिसरात चोरी, खून, लुटमारीच्या घटना वारंवार घडत आहेत.दिल्लीतील चांदनी चौकसारख्या प्रसिद्ध परिसरात फ्रान्सच्या राजदूताचा मोबाईल चोरीला गेला आहे.
भारतातील फ्रान्सचे राजदूत डॉ. थियरी मॅथाऊ यांनी 20 ऑक्टोबर रोजी ई-तक्रार दाखल केली होती. दिल्लीतील चांदनी चौक परिसरातील जैन मंदिराजवळ त्यांचा मोबाईल हरवला असल्याचे त्यांनी तक्रारीत सांगितले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कडक कारवाई करत 4 जणांना अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांनी मोबाईल फोन जप्त केल्याचे सांगितले आहे.भारतातील फ्रान्सचे राजदूत डॉ. थियरी मॅथाऊ यांनी 20 ऑक्टोबर रोजी ई-तक्रार दाखल केली होती. दिल्लीतील चांदनी चौक परिसरातील जैन मंदिराजवळ त्यांचा मोबाईल हरवला असल्याचे त्यांनी तक्रारीत सांगितले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कडक कारवाई करत 4 जणांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी मोबाईल फोन जप्त केल्याचे सांगितले आहे.