उज्जैनमध्ये शुक्रवारी संध्याकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे महाकाल मंदिराच्या गेट क्रमांक 4 ची भिंत कोसळली, त्यामुळे काही लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आणि 5 जखमी झाले. दरम्यान, एसपी प्रदीप शर्मा यांनी दोघांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. बचाव पथकाने जखमींना तातडीने बाहेर काढले आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केले, ज्यांचे मदतकार्य वेगाने सुरू आहे. उज्जैनमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे.
हा पाऊस महाकाल मंदिर परिसरात आपत्ती ठरला. मुसळधार पावसामुळे महाकाल मंदिराच्या गेट क्रमांक चार येथील ज्योतिषाचार्य पंडित आनंद शंकर व्यास यांच्या घराजवळील भिंत अचानक कोसळली, त्यामुळे येथे दुकान थाटून वस्तू विक्री करणारे लोक भिंतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
हे लोक गाडले गेल्याची माहिती महाकाल मंदिर प्रशासनाला मिळताच त्यांनी तात्काळ महाकाल पोलीस ठाणे आणि मंदिर कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात नेले. ढिगाऱ्याखाली किती लोक दबले आहेत आणि किती जणांना बचाव पथकाने बाहेर काढले आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र बचाव पथक सातत्याने बचाव कार्यात गुंतले आहे.