Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बर्थडेच्या दिवशीच मैत्रिणीची पेट्रोल टाकून पेटवून हत्या

Webdunia
शनिवार, 30 डिसेंबर 2023 (20:19 IST)
बर्थडेच्या दिवशी मैत्रिणीला गिफ्ट देताना डोळे बंद करायला सांगितले आणि हातापायात बेड्या बांधल्या आणि सरप्राईज गिफ्ट देण्याचे सांगून मैत्रिणीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून तिची निर्घृण हत्या करण्याची धक्कादायक घटना 24 डिसेंबर रोजी चैन्नईत घडली आहे. नंदिनी असे या मयत तरुणीचे नाव आहे. तर आरोपी मित्र वेंट्रीमारन असे त्याचे नाव आहे. मयत नंदिनी आणि वेंट्रीमारन हे लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते.   

नंदिनी 27 वर्षाची असून ती सॉफ्टवेअर इंजिनियर होती. तर आरोपी मित्र हा एका आयटी कंपनीत होता. एकत्र शिक्षण घेऊन ते दोघे कॉलेज मध्ये वेगळे झाले. त्यांचा एकमेकांशी चांगला संपर्क होता. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद होत होते. दोघांच्या नात्यात दुरावा आला. आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मयत तरुणीने आपल्या जवळच्या खास मित्राला फोन केला आणि वाढदिवसाला बोलावले. आरोपीने तिला सरप्राईझ गिफ्ट देण्याचे सांगितले. नंदिनी फार खुश होती. ते दोघे एकत्र फिरायला गेले. नंतर शॉपिंग केली. अनाथाश्रमात जाऊन मुलांना खाऊ आणि खेळणी वाटप केली. नंतर दोघे मंदिरात गेले. 

संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास आरोपी वेंट्रीमारन ने तिला सरप्राईज गिफ्ट देतो असं महंत तिचे डोळे कापडाने बंद केले आणि हातात बेड्या घातल्या. नंतर तिला चैन्नईच्या पोनमार रोडच्या एका निर्जन स्थळी नेले. अंधार पडला होता. नंदिनीला मित्रावर विश्वास होता म्हणून तिला काही वेगळे जाणवले नाही. मित्राने तिला एका रिकाम्या फ्लॅटवर नेले आणि मी जोवर म्हणत नाही तोवर डोळे उघडायचे नाही असं सांगितले. नंतर त्याने लपवून आणलेली पेट्रोलच्या बाटलीतून पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि तिला पेटवून दिले.ती किंचाळत होती

.तिला पेटलेलं पाहून रस्त्यावरील लोकांनी तिला वाचवले आणि तातडीने रुग्णालयात नेले असता तिने आरोपी वेंट्रीमारन चा फोन नम्बर सांगितलापोलिसांनी त्याचा शोध काढला आणि त्याला विचारपूस करत असताना त्याने कबुल केले.एकतर्फी प्रेमातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.      
 
Edited By- Priya DIxit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments