Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘हनुमान आता आमच्या बरोबर, भाजपविरोधात एकत्र लढू,’ काँग्रेससह 17 पक्षांची पाटण्यात घोषणा

rahul gandhi
, शुक्रवार, 23 जून 2023 (21:28 IST)
ANI
"आम्ही 2024 ची निवडणूक एकत्र लढू आणि भाजपला सत्तेतून बाहेर काढू. आम्ही यात यशस्वी होऊ," असं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पाटण्यात म्हणाले.
 
बिहारची राजधानी पाटणा येथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशातील भाजपविरोधक पक्षांची बैठक बोलावली होती.
 
या बैठकीला काँग्रेस, आप, तृणमूल, शिवसेना, डीएमके, नॅशनल कॉन्फरन्स, सपा, डाव्यांसह 17 पक्षांचे नेते उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, एमके स्टॅलिन, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव यांच्यासह विरोधकांमधील अनेक नेते उपस्थित होते.
 
या बैठकीत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हेही उपस्थित होते.
 
लालू प्रसाद यादव म्हणाले की, "भाजपनं हनुमानाचं नाव घेऊन निवडणुका लढवल्या. निवडणुका आल्या की 'जय हनुमान' करतात. आता हनुमान आमच्यासोबत असतात."
 
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "विरोधकांच्या बैठकीत कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचे नेते होते. सर्व नेते एकजुटीने निवडणुका लढवण्यासाठी एक सामायिक अजेंडा तयार करत आहेत. आम्ही 10 किंवा 12 जुलै रोजी शिमल्यात बैठक घेत आहोत. तारखेत पुढे-मागे होईल."
 
"बिहारमध्ये काय करायचं, यूपीमध्ये काय करायचं, असं प्रत्येक राज्याची स्वतंत्र रणनीती तयार केली जाईल. 2024 ची लढाई एकजुटीने लढायची आहे. भाजपला सत्तेतून हाकलायचे आहे. यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ," असंही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
 
या बैठकीचं आयोजन करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, "पुढे आणखी एक बैठक होणार आहे. पण या बैठकीत एकत्र लढण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालं. आताचं केंद्र सरकार देशाच्या हिताचं काम करत नाहीत. त्यामुळे सगळेच चिंतेत आहेत."
 
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी अगदी छोटेखानी संबोधन केलं. ते म्हणाले की, "भारताच्या मुलभूत रचनेवर आक्रमण होतंय. संस्था मोडल्या जातायेत. आमच्यात काही मतभेद असतील. पण एकत्र काम करण्याचं आम्ही निर्णय घेतलाय. आमच्या विचारधारेचं आम्ही रक्षण करू."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय फार्मास्युटिकल उद्योग २०३० च्या अखेरीस १३० अब्ज डॉलर मूल्यापर्यंत पोहोचेल: राहिल शाह