सध्या सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि लाईक्स मिळवण्यासाठी लोक काहीही करतात. सार्वजनिक ठिकाणी नको ते करून सोशलमिडीयावर व्हायरल करतात. व्हायरल होण्यासाठी चालत्या बाईकवर किंवा आगळे वेगळे स्टंट करतात या मुळे ते अपघाताला बळी पडतात. तरीही डोक्यातून व्हिडीओ व्हायरल करण्याचे वेड काही जात नाही. अशातच एका जोडप्याचा धावत्या बाईकच्या टाकीवर तरुणीला बसवून रोमान्स करण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून धावत्या दुचाकीवर प्रेमी जोडप्यांचा खुल्लेआम रोमान्स करण्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे.
आता उत्तर प्रदेशातील हापूर मध्ये एक प्रेमी जोडपे धावत्या बाईकवर रोमान्स करताना दिसले. याचा व्हिडीओ देखील समोर आला असून नेटकरी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त करत आहे. हे जोडपे वाहतुकीचे नियमांचं उल्लंघन करत असून या बाइक चालकाने हेल्मेट लावलेले नाही.
हा व्हिडीओ दिल्ली-लखनौ महामार्ग NH -9 सिंभोली पोलीस स्टेशन परिसरातील आहे. हा बाईकस्वार मुरादाबादच्या दिशेने जात असून तरुणी बाईकच्या टाकीवर पुढे बसलेली होती आणि ते चिकटून बसले होते. दुचाकी सुसाट वेगाने धावत आहे. हा व्हिडीओ एका कारचालकाने बनवून सोशलमिडीयावर व्हायरल केला.
हा व्हिडीओ पाहून हापूर वाहतूक पोलिसानी या जोडप्यावर कारवाई केली आहे. या दुचाकी स्वाराला 8000 रुपयांचे दंड ठोठावण्यात आले आहे. हेल्मेटशिवाय वाहने बाईक चालवण्यासाठी त्याला दंड केला आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी चालत्या वाहनावर अशा प्रकारचे स्टंट करू नये हे .स्वतःसाठी तर हे धोकादायक आहे आणि यामुळे अपघात घडू शकतात असे आवाहन करण्यात आले आहे.