Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हरियाणवी मॉडेल शीतलची गळा चिरून निर्घृण हत्या

murder
, सोमवार, 16 जून 2025 (14:12 IST)
हरियाणातील सोनीपतच्या खारखोडा येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जिथे हरियाणवी संगीत उद्योगात काम करणाऱ्या शीतल नावाच्या मॉडेलची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. खांडा गावाजवळील एका कालव्यातून मॉडेलचा मृतदेह सापडला आहे.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला असून गुन्हेगारांचा शोध सुरु केला आहे. . 
मृत शीतल काही दिवसांपासून बेपत्ता होती. त्या बाबत कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली होती. दरम्यान खांडा गावाजवळ एका कालव्यातुन शीतलचा मृतदेह आढळून आला. काही दिवसांपूर्वी ती बेपत्ता झाली होती. त्यानंतर कुटुंबाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
ALSO READ: २५० हज यात्रेकरूंच्या विमानाच्या चाकात आग, ठिणग्या आणि धुराचे लोट पाहून लखनौ विमानतळावर घबराट
शीतलचा दरोडेखोऱ्यानी गळा चिरून खून केला आहे. अद्याप मारेकऱ्यांनी ओळख पटली नाही. मृत मॉडेलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.  सोनीपत पोलीस या हत्येचा गंभीरपणे तपास करत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बुलढाणा : देवी दर्शनासाठी गेलेल्या आई आणि मुलीचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू