Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Hathras :नववधूने लग्नात पिस्तुलातून गोळ्या झाडल्या

Webdunia
सोमवार, 10 एप्रिल 2023 (17:28 IST)
लग्न म्हटलं तर आनंदाला पारावर नसतो. लग्नासाठी वरवधू अनेक स्वप्न मांडतात. आपल्या लग्नात काहीसे हटके करावे असे  प्रत्येक जोडप्याला वाटत असते.यूपीच्या हाथरसमध्ये नववधूचा आनंदात गोळीबार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये लग्नाच्या स्टेजवर बसलेली वधू हातात पिस्तुल घेऊन गोळीबार करताना दिसत आहे. या गोळीबाराने वधूच्या शेजारी बसलेला वरही एकदा घाबरला. मात्र, नववधूने स्वतःच्या लग्नात मंचावरून आनंदाने गोळीबार करून कायद्याचा अवमान केला.लग्न या गेस्ट हाऊसमध्ये शुक्रवारीच झाले होते आणि यावेळी नववधूने तिथे जल्लोष केला. वधू हातरस जंक्शन परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे.
 
लग्नात एका व्यक्तीने वधूला पिस्तूल दिले, त्यानंतर वधूने जोरदार गोळीबार केला. नववधूने हवेत सलग चार गोळ्या झाडल्या. गोळीबार केल्यानंतर नववधूने हे पिस्तूल स्टेजवर उभ्या असलेल्या व्यक्तीला दिले. हा व्हिडीओ हातरस जंक्शन भागातील सलेमपूर गावातील एका गेस्ट हाऊसमधील लग्न समारंभाचा आहे.
 
व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी केली जात आहे. तपासानंतर जे समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल.
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments