देशातील अनेक भागामध्ये मान्सून निघून गेला आहे. पण अजून काही ठिकाणी थोड्या प्रमाणात पाऊस पडतोच आहे. हवामान विभागाने गुरुवारी सांगितले की, वादळी हवामानसोबत ताशी 55 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मन्नारची खाडी आणि पूर्व-मध्य बंगालची खाडी ही अधिकांश भागामध्ये जोरदार हवा चालणार आहे. ज्याचा परिणाम यूपी, बिहार आणि एनसीआर वर पडणार आहे. इथे 5 आणि 6 ऑक्टोंबरला ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच काही ठिकाणी हलकासा पाऊस पडू शकतो.
या राज्यामध्ये होईल पाऊस-
हवामान विभागाने मासेमारी करणाऱ्यांना ईशान्य बंगालच्या खाडी कडे न जाण्याचा इशारा दिला आहे. पुढील 6-7 दिवसांमध्ये तामिळनाडू, पॉंडेचरी आणि कराईकल मध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय 4 ऑक्टोंबर ला केरळ, पश्चिम बंगाल, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपुर, मिझोराम आणि त्रिपुरा मध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो.
Edited By- Dhanashri Naik