Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिजबूलचा कमांडर यासीन इट्टूचा खात्मा

Webdunia
सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (09:14 IST)

जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये झालेल्या चकमकीत हिजबूल मुजाहिद्दीन या दहशवादी संघटनेचा कमांडर यासीन इट्टूचा खात्मा झाला आहे.  शोपियामध्ये शुक्रवारी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या तिघांमध्ये यासीन इट्टूचा समावेश होता.

दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू पोलिस, सीआरपीएफ आणि 55 राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत परिसराला वेढा दिला. यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. या चकमकीत भारतीय जवानांनी यासीन इट्टूला कंठस्नान घातलं.  काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी बुरहान वाणी, अबू दुजाना यांच्यानंतर यासीन इट्टू हा प्रमुख दहशतवादी होता. भारतीय सैन्याने जारी केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत यासीन इट्टूचा A प्लस कॅटेगिरीतही समावेश होता. 

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments