Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदी सरकारविरोधात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावा संबंधीचे महत्त्वाचे मुद्दे

मोदी सरकारविरोधात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावा संबंधीचे महत्त्वाचे मुद्दे
, बुधवार, 26 जुलै 2023 (15:03 IST)
मणिपूरमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज गदारोळात सुरू आहे. आजही लोकसभेतले कामकाज वारंवार ठप्प झाले. पंतप्रधानांनी या मुद्द्यावर संसदेत बोलावे अशी मागणी करणाऱ्या विरोधकांना आपण चर्चेसाठी तयार आहोत असं उत्तर गृहमंत्री अमित शाह यांनी दिले होते.
 
मात्र आता काँग्रेसने सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी हा प्रस्ताव दिला असून तो लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वीकारला आहे.
 
2018 साली तेलगू देसमच्या जयदेव गल्ला यांनी आंध्र प्रदेशच्या बाबतीत केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचा आऱोप करुन अविश्वासाचा प्रस्ताव आणला होता. मात्र चर्चेअंती हा प्रस्ताव मोठ्या फरकाने फेटाळला गेला होता.
2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपाला मोठे यश मिळाल्याने सत्ताधारी बाकांवर अधिक सदस्य दिसून येतात.
 
2018च्या अविश्वास प्रस्तावाच्यावेळेस अनेक नेत्यांची भाषणं गाजली होती मात्र आता परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी आता लोकसभेचे सदस्य नाहीत. काँग्रेसचे लोकसभेतील तत्कालीन गटनेते मल्लिकार्जून खर्गे राज्यसभेत विरोधीपक्षनेते झाले आहेत.
 
ज्योतिरादित्य सिंदिया भाजपात जाऊन केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत.
 
गेल्या लोकसभेत 16 खासदार असणारा तेलगू देसम पक्ष आता 3 खासदारांवर आला आहे. गेल्या अविश्वास प्रस्तावाच्यावेळेस लोकसभेचे संचलन करणाऱ्या सुमित्रा महाजन आता निवडणुकांच्या राजकारणातून बाहेर पडल्या आहेत.
 
अविश्वास ठरावाबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे
 
जर अविश्वास ठरावाला 50 पेक्षा जास्त लोकसभा सदस्यांचा पाठिंबा असेल तर लोकसभाअध्यक्ष चर्चेची वेळ आणि तारीख ठरवतात.
लोकसभेचा कोणताही खासदार हा प्रस्ताव दाखल करू शकतो. त्याच्याकडे 50 सदस्यांचा पाठिंबा असला पाहिजे.
लोकसभेच्या नियम 198 नुसार ही नोटीस लिखित स्वरुपात सकाळी 10 वाजण्यापूर्वी अध्यक्षांकडे द्यावी लागते मग अध्यक्ष ती लोकसभेत वाचून दाखवतात.
नोटीस स्वीकारल्यावर 10 दिवसांच्या आत तारीख ठरवतात. जर सरकारने आपलं संख्याबळ दाखवू शकलं नाही तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो.
पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळातील हा दुसरा अविश्वासदर्शक ठराव आहे.
सध्या सत्ताधारी एनडीएकडे 325 खासदारांचे बळ आहे तर अविश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने फक्त 126 खासदार आहेत.
सत्ताधारी पक्षाकडे दोन्ही सभागृहांत बहुमत आहे. मात्र अविश्वासदर्शक प्रस्तावाला विरोधकांच्या एकतेच्या रुपात पाहिले जात आहे.
सध्याचे राजकीय पक्ष आणि त्यांचे लोकसभेतील बलाबल
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (NDA) सदस्य पक्ष
 
भारतीय जनता पक्ष - राष्ट्रीय पक्ष - 301
शिवसेना - महाराष्ट्र - 13
राष्ट्रीय लोक जनशक्ति पार्टी (पशुपती कुमार पारस) - बिहार - 05
अपना दल (सोनिलाल) - उत्तर प्रदेश - 02
नॅशनल पीपल्स पार्टी - राष्ट्रीय पक्ष - 01
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) - महाराष्ट्र - 01
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान) - बिहार - 01
नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टी - नागालँड - 01
ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन - झारखंड - 01
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा - सिक्कीम - 01
मिझो नॅशनल फ्रंट - मिझोराम - 01
नागा पीपल्स फ्रंट - नागालँड - 01
इंडिजिनिअस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा - त्रिपुरा - 00
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) - महाराष्ट्र - 00
आसाम गण परिषद - आसाम - 00
पत्तल्ली मक्कल कत्छी - तामिळनाडू - 00
तमीळ मनिला काँग्रेस - तामिळनाडू - 00
युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल - आसाम - 00
सुहेलदेव भारतीय समाज पार्टी - उत्तर प्रदेश - 00
शिरोमणी अकाली दल (संयुक्त) - पंजाब - 00
महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी - गोवा - 00
जननायक जनता पार्टी - हरयाणा - 00
प्रहार जनशक्ती पार्टी - महाराष्ट्र - 00
राष्ट्रीय समाज पक्ष - महाराष्ट्र - 00
जनसुराज्य शक्ती पार्टी - महाराष्ट्र - 00
कुकी पीपल्स अलायन्स - मणिपूर - 00
युनायटेड डेमोक्रेटिक पार्टी - मेघालय - 00
हिल स्टेट पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी - मेघालय - 00
निशाद पार्टी - उत्तर प्रदेश - 00
ऑल इंडिया एन. आर. काँग्रेस - पुदुच्चेरी - 00
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम) - बिहार - 00
जन सेना पार्टी - आंध्र प्रदेश - 00
हरयाणा लोकहित पार्टी - 00
भारत धर्म जन सेना - केरळ - 00
केरळ कामराज काँग्रेस - केरळ - 00
पुतिया तमिलगम - तामिळनाडू - 00
गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट - पश्चिम बंगाल - 00
ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) - तामिळनाडू - 00
Indian National Developmental Inclusive Alliance मधील (I.N.D.I.A.) सदस्य पक्ष
 
काँग्रेस - राष्ट्रीय पक्ष - 49
द्रविड मुनेत्र कळघम - तामिळनाडू 24
ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस - पश्चिम बंगाल - 23
जनता दल (संयुक्त) - बिहार - 16
शिवसेना (उबाठा) - महाराष्ट्र - 06
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष {CPI(M)} - राष्ट्रीय पक्ष - 03
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) - महाराष्ट्र - 03
समाजवादी पक्ष - उत्तर प्रदेश - 03
जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स - जम्मू काश्मीर - 03
इंडियन युनियन मुस्लीम लीग - केरळ - 03
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI)- केरळ - 02
विदुतलाई चिरुतैगल कत्छी (VCK) - तामिळनाडू - 02
आम आदमी पक्ष - राष्ट्रीय पक्ष - 01
झारखंड मुक्ती मोर्चा - झारखंड - 01
केरळ काँग्रेस (M) - केरळ - 01
मरुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (MDMK) - तामिळनाडू - 01
रेव्हल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (RSP) - पश्चिम बंगाल - 01
कोंगुनाडू मक्कल देसिया कत्छी (KMDK) - तामिळनाडू - 01
राष्ट्रीय जनता दल - बिहार - 00
राष्ट्रीय लोक दल - उत्तर प्रदेश - 00
अपना दल (कमेरावादी) - उत्तर प्रदेश - 00
पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (PDP) - केरळ - 00
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्स-लेनिनिस्ट लिबरेशन {CPI(ML)} - बिहार - 00
ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक - पश्चिम बंगाल - 00
मणितनेया मक्कल कत्छी (MMK) - तामिळनाडू - 00
केरळ काँग्रेस (जोसेफ) - केरळ - 00
अद्याप भूमिका जाहीर न केलेले प्रमुख पक्ष
वायएसआर कांग्रेस पक्ष - आंध्र प्रदेश - 22
बिजू जनता दल - ओडिशा - 12
भारत राष्ट्र समिती - तेलंगण - 09
बहुजन समाज पार्टी - राष्ट्रीय पक्ष - 09
तेलुगू देसम पार्टी - आंध्र प्रदेश - 03
ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलीमिन (AIMIM) - तेलंगण - 02
जनता दल (सेक्युलर) - कर्नाटक - 01
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - महाराष्ट्र - 00
 
Published By- Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात पावसाचा जोर; कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट, कुठे ऑरेंज अलर्ट?