Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘या गावात मुलं मुठी आवळतात, मान टाकतात आणि क्षणार्धात मरतात, मुलं जन्माला घालायला भीती वाटते’

Webdunia
मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (22:05 IST)
लक्काजू श्रीनिवास
अशोक हे एक वॅन ड्रायव्हर आहेत. 11 ऑगस्ट 2021 या दिवशी 12 वाजता ते त्यांच्या तीन महिन्याच्या बाळाशी खेळत होते. लवकरच ते दोघंही झोपी गेले.
 
काही मिनिटातच त्यांच्या मुलीने मुठी आवळल्या, डोकं मागे केलं आणि जोरजोरात रडायला लागली. तिला हॉस्पिटलमध्ये न्यायलाही वेळ मिळाला नाही.
 
अशोक यांनी दुसऱ्यांदा अशा पद्धतीने मूल गमावलं.
 
त्याआधी एक दिवशी अरुण यांच्या पत्नीने मुलीला दूध दिलं आणि ते मूल दगावलं होतं. जेव्हा ते मूल दगावलं तेव्हा त्या मुलीचं नाव सुद्धा या जोडप्याने ठेवलं नव्हतं.
 
अशोक आणि मत्स्यम्मा यांच्याप्रमाणे आंध्र प्रदेशच्या रुधकोटा खेड्यात 20 मुलांचा मृत्यू झाला होता.
 
वैद्यकीय पथक या मृत्यूंचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ते अद्याप सापडलं नाही.
 
या गावात दगावलेली सर्वं मुलं तीन ते सहा महिन्यांमधली होती.
 
आम्हाला आता मूलबाळ नकोय
“आमच्या मांडीत मरायला आम्ही मुलांना का जन्म द्यावा? आम्हाला आता मुलबाळ नकोय. जेव्हा खेड्यातली स्थिती चांगली होईल तेव्हाच आम्ही मूल जन्माला घालू, नाहीतर आम्हाला मूल नकोय,” असं बालू आणि संध्याराणी म्हणाले.
 
त्यांनी गेल्या तीन महिन्यांपूर्वी त्यांचं मूल गमावलं. बीबीसीशी ते बोलत होते.
 
“मी आधीच दोन मुलं गमावली आहेत. त्याची कारणं माहिती नाहीत. मृत्यूच्या क्षणापर्यंत ती मुलं एकदम ठीक होती. आमच्याशी छान बोलायची. पण लगेच काय होतं काही कळत नाही. ते मुठी आवळतात, मान टाकतात आणि क्षणार्धात ते मरण पावतात. प्राथमिक आरोग्य केंद्र बाजूलाच आहे. पण तिथे जाईपर्यंतसुद्धा वेळ मिळत नाही. आम्ही काय करू?” संध्याराणी बोलत होत्या.
 
मी आता गरोदर राहिले तरी या गावात राहणार नाही असंही त्या म्हणाल्या.
 
या गावात एक बाई सून म्हणून आली. गरोदर राहिल्यावर प्रसुतीसाठी त्या माहेरी म्हणजे हुकुमपेटा गावात राहिल्या. मूल तिथे जन्माला आलं. तरीही तीन महिन्याची असताना ती मुलगी दगावली.
 
या गावात कोणीच सहा महिने गरोदर राहिलं नाही
 
2019 ते मे 2022 मध्ये 17 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पुढच्या सहा महिन्यात तिथे एकाही बाळाचा मृत्यू झाला नाही.
 
त्याचवर्षी जानेवारी, मे आणि ऑगस्टमध्ये तीन बाळांचा मृत्यू झाला.
 
आतापर्यंत या गावात 20 बाळांचा मृत्यू झाल्याचं या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी सत्या राव यांनी बीबीसीला सांगितलं.
 
या गावात गरोदर राहिल्या असतील, गावाबाहेर गरोदर राहिल्या असतील, तरी ही बाळं दगावली आहेत. डॉ. सत्या राव म्हणाले की याची कारणं स्पष्ट नाहीत.
 
“एकापाठोपाठ एक मूल दगावल्यामुळे आम्ही येथे मुलांना जन्म द्यायला कचरत आहोत. त्यामुळेच या गावात मे आणि जून 2022 नंतर कोणीही गरोदर राहिलेलं नाही. गेल्या सहा महिन्यात कोणतीच बाळं दगावली नाहीत, याचा मला आनंद आहे. जानेवारी 2023 मध्ये पुन्हा हा सिलसिला सुरू झाला मला कळत नाही इथे काय चाललंय ते,” असं रुधकोट मधील सुभद्रा राव यांनी बीबीसीला सांगितलं.
 
सुभद्रा यांचा मुलगा ऑगस्ट 2021 मध्ये जन्माला आला आणि चार महिन्यातच तो दगावला.
 
रौमलम्मा या 64 वर्षांच्या आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांनी कधीही इतकी मुलं दगावताना पाहिलेली नाहीत.
 
सरकारी समितीने काय निर्णय दिला?
बीबीसीने या गावात 2021 मध्ये भेट दिली होती आणि त्यावर लेखांची एक मालिकाही केली होती. सरकारच्या नजरेसही हे प्रकरण आलं होतं.
 
या गावात एकूण 970 लोक आहेत. त्यातील बहुतांश लोक सुशिक्षित आहेत. बहुतांश लोक एकमेकांच्या नात्यात आहेत.
 
जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात सरकारने एक समिती नेमली होती. या समितीने 12 जानेवारी 2022 ला इथे भेट दिली होती.
 
या समितीने दिलेल्या अहवालाप्रमाणे बाळ उलट्या करून आणि रडून मरतात, जी बाळं दगावली त्यांचं वजन योग्य प्रमाणात होतं. या सर्व मुलांचा मृत्यू स्थानिक पातळीवर तयार झालेल्या औषधामुंळे झाला आहे.
 
दूध वेळेवर न मिळणं, ठरलेल्या डोझपेक्षा जास्त औषध, श्वासात अडथळे, डायरिया ही या मुलांच्या मृत्यूंची कारणं नाहीत.
 
शासनच्या समितीलाही मृत्यूची कारणं नीटशी कळली नाहीत.
 
आंध्रात बालमृत्यूदर कमी
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अहवालाप्रमाणे, राज्यातील बालमृत्यूदर प्रचंड प्रमाणात कमी झाला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत आंध्र प्रदेशचा मृत्यूदर बराच कमी आहे.
 
तो 2018 मध्ये 29, 2019 मध्ये 25 आणि 2020 मध्ये 24 होता.
 
रुधाकोटमध्ये गेल्या तीन वर्षांपासून मृत्यूचं तांडव सुरू असूनसुद्धा प्रशासनाने फारशी काही कारवाई केलेली नाही, असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे.
 
एखादा मृत्यू झाल्यावर ते येतात आणि घाईघाईने निघून जातात
 
“रुधाकोटमध्ये होणाऱ्या मृत्यूंचं कोणतंच कारण समोर आलेलं नाही. या खेड्यांमध्ये आणीबाणी जाहीर करावी अशी मागणी आम्ही नेहमीच करत आलो आहोत,” असं आदिवासी गटाच्या एका नेत्याने बीबीसीला सांगितलं
 
‘तपास सुरू आहे’
रुधकोट येथील प्रकल्प विकास अधिकाऱ्यांशी बीबीसीने चर्चा केली.
 
ते म्हणाले, “या गावातल्या मृत्यूदरांवर तपास सुरू आहे. तसंच या गावातले वैद्यकीय अधिकारीसुद्धा या गावातल्या स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
 
आतापर्यंत मृत्यूचं ठोस कारण समजू शकलेलं नाही. गावात शुद्ध पाणी देण्यात आहे, तसंच योग्य प्रसुतिगृह बांधलं आहे. ड्रग्स आणि अल्कोहोलचं सेवन करू नये असा प्रसार गावात करण्यात येत आहे.”
 
या मुलांच्या मृत्यूचं कोणतंही ठोस कारण समोर येत नाहीये असंच सरकारी अधिकारी वारंवार सांगत आहेत.
 
आता जेव्हा बीबीसीने या गावाला भेट दिली तेव्हा गरोदर बायका शहरात दिसत होत्या. दोन बायका प्रसुतीसाठी इतरत्र गेल्या होत्या, असं स्थानिकांनी सांगितलं.
 
ज्यांनी आपली मुलं गमावली ती लोक मोबाईलवर त्यांचा फोटो पाहून आठवणी काढत आहेत.
 
आता जेव्हा वैद्यकीय अधिकारी योग्य पद्धतीने प्रसुती करतील तेव्हाच मुलं जन्माला घालू, असं इथल्या तरुण जोडप्याचं म्हणणं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments