Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

जगातिक सर्वाधिक कुपोषित बालके भारतात

जगातिक सर्वाधिक कुपोषित बालके भारतात
भारतीय अर्थव्ववस्था वेगाने प्रगती करत असल्याचा दावा केला जात असला तरी या विकासाची फळे सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळेच कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत भारत पहिल्या स्थानावर असल्याची आकडेवारी समोर आली आहे. असोचेम आणि ईवाय यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून ही चिंताजनक माहिती पुढे आली आहे. 
 
भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होत असला तरी त्याचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचत नसल्याचे असोमेच आणि ईवाय यांच्या सर्वेक्षणातून अधोरेखित झाले आहे. भारतात कुपोषणग्रस्त बालकांची संख्या सर्वाधिक असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. कुपोषणाच्या विळख्यात सापडलेल्या जगातील एकूण बालकापैंकी 50 टक्के बालके भारतातील आहेत. त्यामुळे सामाजिक असमानता दूर करण्यासाठी आणि आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी धोरणांची आखणी करणे आवश्यक असल्याचे असोचेम आणि ईवायने अहवलात नमूद केले आहे.
 
मात्र या काळात कुपोषणाची समस्या वाढली आहे त्यामुळे जगातील एकूण कुपोषणाग्रस्त बालकांपैकी 50 टक्के बालके भारतातील आहे. 2015 मध्ये देशातील 40 टक्के बालके कुपोषणचा सामना करत होती असेही आकडेवारीतून समोर आले आहे. देशातील 37 टक्के बालकांचे वजन अतिशय कमी आहे. तर 39 टक्के मुलांचे वजन त्यांच्या वयाच्या तुलनेत कमी आहे. याशिवाय उंचीच्या तुलनेत वजन कमी असणार्‍या देशातील बालकांचे प्रमाण 21 टक्के आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकींगसाठी 'आधार' सक्ती