Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतात पहिल्यांदाच थिएटर ऑलिम्पिक्स

Webdunia
यंदा भारतात पहिल्यांदाच  थिएटर  ऑलिम्पिक्स भरत आहे.  1993 सालापासून ही  परंपरा सुरु आली आहे. दिल्लीत  17 फेब्रुवारी ते 8 एप्रिल असा  हा सांस्कृतिक कुंभमेळा भरणार आहे. त्यामुळे एनएसडी अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या परिसरात सध्या एक वेगळीच घाई सुरु आहे. थिएटर ऑलिम्पिक्ससाठी नाट्यक्षेत्रातले आंतरराष्ट्रीय दिग्गज भारतात येणार असून या वैश्विक महोत्सवाची लगबग या कॅम्पसमध्ये पाऊल ठेवल्यावरच जाणवते.
 
1993 मध्ये ग्रीसमध्ये पहिल्या थिएटर ऑलिम्पिकची सुरुवात झाली. त्यानंतर आता हे आठवं ऑलिम्पिक भारतात पार पडणार आहे. जगभरातले 25 हजार हून अधिक कलाकार पुढच्या दीड महिन्यांत या महारंगमंचावर आपली कला सादर करतील. दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर 17 फेब्रुवारीला या महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. तर 8 एप्रिलला मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर त्याचा समारोप सोहळा पार पडेल.दिल्लीसह मुंबई, बंगळुरु, कोलकाता अशा 17 शहरांमध्ये नाटकांचं सादरीकरण होणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments