भारतीय रेल्वेने आता पेपरलेस ओळखपत्राची सुरुवात केली आहे. यापुढे तुमचा मोबाईल हाच तुमच्या ओळखपत्राचा पुरावा असेल. भारतीय रेल्वे मंत्रालयाने एम-आधार हा प्रवासादरम्यानचा ओळखीचा पुरावा म्हणून दाखवण्यास मान्यता दिली आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान ओळखपत्राचा पुरावा सोबत ठेवावा लागतो. तिकीत मोबाईलवर दाखवल्यानंतरही ओळखपत्र देखील दाखवावे लागते. आता मात्र तुमच्या मोबाईलमधील तिकीट आणि त्याच मोबाईलमधील आधारकार्ड तुम्ही टिसीला दाखवू शकता. संबंधित व्यक्ती मोबाईलमधील एम-आधार ओळखपत्राचा पुरावा दाखवू शकतो. आरक्षण करण्यात आलेल्या सर्व श्रेणीसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने एम-आधार हे ॲप जुलै महिन्यात लॉन्च केले होते. या ॲपच्या मदतीने व्यक्ती स्वत:चे आधार डाऊनलोड करून घेऊ शकते.