Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयपीएलच्या वेळेत बदल होणार, सामने दुपारी ३ आणि संध्याकाळी ७

IPL 2018 Schedule
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये लवकरच नवीन बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आयपीएलचे यापुढच्या मोसमातील सामने हे दुपारी तीन आणि संध्याकाळी सात वाजता खेळवण्यात येतील. याआधी आयपीएलच्या मागील दहा मोसमात दुपारी चार आणि रात्री आठ वाजता सामन्यांना सुरुवात होत होती. पण आता लवकरच हे नवे बदल करण्यात येणार आहेत.
 
यासंदर्भातला प्रस्ताव आयपीएल कमिशनर राजीव शुक्ला यांनी बीसीसीआय आणि आयपीएल प्रशासकीय समितीसमोर ठेवला आहे. आयपीएलच्या सर्व फ्रेंचायझींना हा निर्णय मान्य असून केवळ प्रसारणाचे हक्क असलेल्या स्टार इंडियाच्या संमतीची आवश्यकता असल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आंतरराष्ट्रीय दबावामुळे हाफिजला पुन्हा ताब्यात घेतले