Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजस्थानचे शर्मा अमेरिकन लष्करात वैज्ञानिक, तब्बल 1.2 कोटीचे पॅकेज

Webdunia
मंगळवार, 9 मे 2017 (17:04 IST)
राजस्थानच्या मोनार्क शर्मा यांना अमेरिकन लष्करात वैज्ञानिक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. अमेरिकेच्या लढाऊ हेलिकॉप्टर युनिटमध्ये तो काम करणार आहे. यासाठी अमेरिकन लष्कर मोनार्क शर्माला वार्षिक तब्बल 1.2 कोटी रुपयांचे पॅकेज देत आहे.  अमेरिकेच्या लष्करात नुकताच एएच-64ई हा लढाऊ हेलिकॉप्टर समाविष्ट करण्यात आला आहे. या हेलिकॉप्टरच्या डिझाईन, निरीक्षण, उत्पादन आणि काळजी घेण्याची जबाबदारी मोनार्कला दिली आहे.
 
अमेरिकन लष्करात वर्षभरात दाखल होणारे AH-64E या हेलिकॉप्टरचे डिझाइन, त्याची निर्मिती आणि संशोधन करण्याची जबाबदारी शर्मा यांच्याकडे देण्यात आली आहे. शर्मा यांनी 'नासा'मधून कनिष्ठ संशोधक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर मे २०१६मध्ये शर्मा यांनी अमेरिकने लष्करात प्रवेश केला. शर्मा यांनी केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळे त्यांना २०१६मध्ये 'आर्मी सर्व्हिस मेडल' आणि 'सर्वोत्तम सुरक्षा' पुरस्कार मिळाले. 
 
शर्मा यांनी नासाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ६वा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्यांनी नासामध्ये काम सुरु केले. चंद्रावरून मातीचे नमुने गोळा करण्याच्या यंत्र निर्मितीमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले होते.    
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments