Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Jalandhar : रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (17:00 IST)
Jalandhar :पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात एका घरात रेफ्रिजरेटर कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन तीन मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. प्रशासनाने अद्याप या घटनेला दुजोरा दिला नाही. 
 
जालंधरच्या अवतार नगर गल्ली क्रमांक 12 मध्ये रविवारी रात्री हा अपघात झाला आणि रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यानंतर घरात मोठी आग लागली.  माहितीनुसार, यशपाल घई (70), रुची घई (40), मंशा (14), दिया (12) आणि अक्षय (10) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. आता घरात एक वृद्ध महिला आहे. 
मृत यशपाल घई चे भाऊ राज घई सांगतात की, कुटुंबाने सात महिन्यांपूर्वी डबल डोअर फ्रिज विकत घेतला होता. रेफ्रिजरेटरचा कंप्रेसर फुटल्याने हा अपघात झाला. 
 
अग्निशमन दलाचे जवान घराच्या आत गेल्यावर गॅससिलिंडर चा उग्र वास येत होता. जळालेल्या लोकांना बाहेर काढल्यानंतर त्यांनी आग विझवण्यापूर्वी सिलिंडर बाहेर काढले. एका शेजाऱ्याने सांगितले की, त्याला सिलिंडर फुटल्याचा किंवा कॉम्प्रेसर फुटल्याचा आवाज आला नाही. जेवण आटोपून ते  टेरेसवर फिरायला गेले  असता त्यांना  घरातून धूर निघताना दिसला.

रात्रीचे जेवण करून फिरायला निघालेल्या 30 जणांना घरातून धूर निघताना दिसला. त्यांनी अग्निशमन विभाग आणि पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रथम मुलांना बाहेर काढले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच 15 वर्षांची मुलगी आणि 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अन्य तिघांचाही मृत्यू झाला.
 
स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी नमुने गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
 






Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments