जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील थाटरी गावात रात्री उशिरा मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे आलेल्या पूरामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी बचाव पथकाला त्यांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या नैसर्गिक आपत्तीत 11 जण जखमी झाले असून, अनेक घरे, दुकानांचे नुकसान झाले आहे. एका शाळेच्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. पूराच्या पाण्यामध्ये काही घरे वाहून गेली तर, काही घरे कोसळली.