Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जपानी मुलांनी पंतप्रधान मोदींशी हिंदीतून संभाषण केलं

जपानी मुलांनी पंतप्रधान मोदींशी हिंदीतून संभाषण केलं
, सोमवार, 23 मे 2022 (11:06 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड लीडर्स समिटमध्ये सहभागी होण्यासाठी टोकियो, जपान येथे पोहोचले आहेत. टोकियोमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हजारो भारतीयांनी भारत माता की जयच्या घोषणा देत पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यादरम्यान जपानच्या मुलांनीही एका हॉटेलमध्ये पंतप्रधान मोदींचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले.
 
टोकियोला पोहोचल्यावर अनेक मुले पीएम मोदींच्या स्वागतासाठी पोहोचली. मुले पीएम मोदींचे पेंटिंग घेऊन त्यांचा स्वागत करत होते. पंतप्रधान मोदींनी मुलांच्या चित्रांवर ऑटोग्राफही दिले. यावेळी मुलांनी पंतप्रधान मोदींशी हिंदीत संवाद साधला. यावर ते म्हणाले , 'व्वा! तुम्ही हिंदी कुठून शिकलात? तुम्हाला चांगले बोलता येतं ?'
 
तेथे राहणाऱ्या भारतीयांनी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी 'जय श्री राम' आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या. तसेच यावेळी पीएम मोदींना 'लायन ऑफ मदर इंडिया' असे संबोधण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी लोक हातात पोस्टर घेऊन उभे दिसले, ज्यामध्ये लिहिले आहे की, 'ज्यांनी 370 रद्द केली ते टोकियोमध्ये आले आहेत.
 
या भेटीबाबत पीएम मोदी म्हणाले, 'जपानचे पंतप्रधान श्री फ्युमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून मी 23-24 मे 2022 दरम्यान टोकियो, जपानला भेट देणार आहे. मार्च 2022 मध्ये, मला पंतप्रधान श्री किशिदा यांनी 14 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले होते. माझ्या टोकियो भेटीदरम्यान, मी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी मजबूत करण्याच्या उद्देशाने आमचा संवाद सुरू ठेवण्यास उत्सुक आहे.
 
पंतप्रधान मोदी क्वाड समिटमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या पंतप्रधानांसोबत सामील होतील. सूत्रांनी सांगितले की ते 36 हून अधिक जपानी सीईओ आणि शेकडो भारतीय प्रवासी सदस्यांशी चर्चा करतील. ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अँथनी अल्बानीज प्रथमच क्वाड लीडर्स कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार आहेत. पंतप्रधान त्यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

16 मजुरांना घेऊन जाणारा ट्रक उलटून आठ जणांचा जागीच मृत्यू