Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Jhansi : PUBG खेळायला रोखल्यामुळे मुलाने केली आई-वडिलांची हत्या, आरोपी मुलाला अटक

murder
, रविवार, 6 ऑगस्ट 2023 (12:10 IST)
सध्या सर्वांना मोबाईलचे व्यसन जडले आहे. तरुणाई तर सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करतात. सध्या तरुणांना ऑनलाईन गेमचे व्यसन लागले आहे. PUBG खेळायला नाही म्हटल्यामुळे झाशी शहरात एका मुलाने शुक्रवारी रात्री उशिरा आपल्या खोलीत झोपलेले वडील आणि आईची लोखंडी तवा आणि काठीने बेदम मारहाण करून हत्या केली. PUBG गेमच्या जाळ्यात अडकल्याने तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. आदल्या दिवशीही तो मोबाईलवर गेम खेळत होता. संतापलेल्या वडिलांनी त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घरात लपवून ठेवला. त्यावेळी तो तरुण संतापून आपल्या खोलीत गेला, मात्र रात्री उशिरा त्याने झोपलेल्या पालकांवर हल्ला केला.
 
लक्ष्मी प्रसाद झा आणि विमला झा असे मयत दम्पत्तीचे नाव आहे. लक्ष्मी प्रसाद झा हे एका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. ते पत्नी विमला (55) आणि एकुलता एक मुलगा अंकित (28) यांच्यासह पिछोर येथे राहत होते. तीन मुलींपैकी मोठी मुलगी नीलम आणि सुंदरी विवाहित आहेत तर धाकटी मुलगी शिवानी ओराई येथे शिकते.
 
नीलम ने सांगितले की, अंकिताला पबजी गेम खेळण्याचे व्यसन लागले. यावरून वडील त्याला अनेकदा रागवायचे. त्याच्याकडून  वडील मोबाईलही हिसकावून घ्यायचे. पण त्यानंतरही अंकितला जेव्हा-जेव्हा मोबाईल मिळत असे तेव्हा तो गुपचूप PUBG खेळत असायचा . शुक्रवारीही अंकितला मोबाईल मिळाला. वडील लक्ष्मी प्रसाद यांनी त्यांच्या हातातील मोबाईल पाहिल्यानंतर त्यांना फटकारले व मोबाईल हिसकावून त्यांच्या खोलीतील कपाटात ठेवला. यामुळे अंकित चिडला. होते. शुक्रवारीही अंकितला मोबाईल मिळाला. वडील लक्ष्मी प्रसाद यांनी त्यांच्या हातातील मोबाईल पाहिल्यानंतर त्यांना फटकारले व मोबाईल हिसकावून त्यांच्या खोलीतील कपाटात ठेवला. यामुळे अंकित चांगलाच संतापला.
 
रात्री सर्व जण जेऊन झोपायला गेले.लक्ष्मी प्रसाद पत्नी विमलासोबत खालच्या खोलीत होते. तर अंकित पहिल्या मजल्यावरील त्याच्या खोलीत गेला. अटक केलेल्या अंकितच्या चौकशीत जे काही समोर आले आहे त्यानुसार, रात्री 2 वाजेच्या सुमारास अंकित अचानक वडिलांच्या खोलीत आला. त्याने हातात लोखंडी तवा धरला होता. या तव्याने त्याने वडील लक्ष्मी प्रसाद यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर अनेक वार केले. आरडाओरडा ऐकून शेजारीच झोपलेली त्यांची पत्नी विमला जागी झाली. ती मध्यस्थी करण्यासाठी पुढे येताच अंकितने तिच्यावर तव्यानेआणि काठीने हल्ला केला.
 
रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने आई विमलाही तेथेच पडली. लक्ष्मी प्रसादचा जागीच मृत्यू झाला तर विमला गंभीर जखमी झाली. यानंतर अंकित पुन्हा त्याच्या खोलीत गेला. झाशी येथे राहणारी त्यांची मुलगी नीलम हिने वडील लक्ष्मी प्रसाद यांना फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या  काशीराम यांना  फोन करून वडिल फोन उचलत नसल्याचे सांगितले. यावर काशीराम त्यांच्या घरी पोहोचले.
 
लक्ष्मी प्रसाद आणि त्यांची पत्नी बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांना या घटनेची माहिती दिली. काही वेळातच परिसरातील लोकही जमा झाले. त्यावेळी विमला श्वास घेत होती. त्यानेच आपल्या मुलाने या दोघांवर हल्ला केल्याचे पोलिसांना सांगितले. काही वेळातच विमला यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांचा ही वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी तरुण अंकितला घरातूनच अटक केली आहे.
 

Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pune : झुरळांमुळे पनवेल -नांदेड एक्स्प्रेस थांबली