Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तमिळनाडूत सर्व जागांवर लढणार : कमल हसन

kamal hassan
चेन्नई , गुरूवार, 8 नोव्हेंबर 2018 (09:24 IST)
अभिनेते आणि मक्कल निधी मय्यमचे अध्यक्ष कमल हसन यांनी त्यांच्या वाढदिवशी महत्त्वाची राजकीय घोषणा केली. 
 
त‍मिळनाडू विधानसभा पोटनिवडणुकीच्या सर्व 20 जागा लढणार आहे. त्यासाठी पक्षाने 20 विधानसभा मतदारसंघात 80 टकके कार्यकर्ते नेमले आहेत, असे त्यांनी सांगितले.
 
विधानसभा पोटनिवडणूक कधी होणार आहे, हे कुणालाही माहिती नाही. मात्र, जेव्हा कधी या निवडणुका होतील, त्या लढण्यासाठी आम्ही तयार असू. त्यादृष्टीने पक्षाने मतदारसंघांमध्ये कार्यकर्ते नेमले आहेत, असे हसन यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले.
 
जनतेच्या हितासाठी आम्ही ही लढाई लढतोय. आमचा कोणत्याच राजकीय पक्षाशी किंवा संघटनेशी संबंध नाही. 
 
राज्य सरकारने भ्रष्टाचार संपवण्यासाठी उचललेल्या पावलामुंळे जनतेलाच फायदा होईल, असेही ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर : शिवराजसिंह चौहानांच्या मेहुण्याला दिले तिकीट