Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

करूणानिधी यांची प्रकृती गंभीर, अतिदक्षता विभागात उपचार सुरू

Karunanidhi's condition is critical
, मंगळवार, 7 ऑगस्ट 2018 (09:02 IST)
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक प्रमुख एम. करूणानिधी यांची प्रकृती गंभीर आहे. पुढील २४ तास त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे रूग्णालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.  
 
करूणानिधींच्या वयोमानामुळे त्यांच्या शरीरातील सर्व अवयव योग्य पद्धतीने कार्यरत ठेवण्याचे वैद्यकीय पथकाला मोठे आव्हान आहे. त्यांच्यावर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात आले आहे. उपचारादरम्यान त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरच पुढील उपचाराची दिशा ठरेल, असे या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे.
Karunanidhi's condition is critical
याचवर्षी ३ जून रोजी करूणानिधी यांनी आपला ९४ वा वाढदिवस साजरा केला. सुमारे ५० वर्षांपूर्वी त्यांनी २६ जुलै रोजी द्रमुकची धुरा आपल्या हातात घेतली होती. ते पाच वेळा मुख्यमंत्री आणि १२ वेळा विधानसभा सदस्य राहिले आहेत. आतापर्यंत त्यांनी ज्या-ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी विजय संपादन केला आहे. 
Karunanidhi's condition is critical

केंद्रीय मंत्री नीतिन गडकरी करुणानिधी यांच्या आरोग्याची चौकशी घेण्यासाठी चेन्नईच्या कावेरी दवाखान्यात पोहोचले. नीतिन गडकरी यांनी डीएमके नेता स्टालिन आणि कनिमोई यांना भेटून करुणानिधी यांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Samsung Galaxy On8 चा भारतात पहिला सेल जाहीर