व्हॅटिकन सिटीने केरळ नन बलात्कारप्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कल यांची हकालपट्टी केली आहे. मुलक्कल यांची चौकशी सुरू असल्याने तसेच या प्रकरणी सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्याने व्हॅटिकन सिटीने हा निर्णय घेतला, मुलक्कल यांची केरळ पोलिसांनी सहा तास कसून चौकशी केली .टिकन सिटीला पत्र लिहून आपल्याला काहीकाळ जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे अशी मागणी केली आहे.मुलक्कल यांनी एक पत्रक काढून सर्व प्रशासकीय अधिकार दुसऱ्या पादरींकडे सोपवले होते. मुलक्कल यांच्यावर 2014 ते 2016 दरम्यान एका ननवर बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यामुळे आता हे व्हॅटिकन सिटीने दखल घेतलेलं प्रकरण कोणत वळण घेणार आहे, त्यातून काय निर्माण होणार आहे असे प्रश्न समोर येत आहे. तर हा बिशप दोषी असेल तर कठोर शासन व्हावे असे सर्वांचे मत आहे.