Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुसऱ्या लग्नासाठी बाळाची हत्या

Webdunia
बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (10:15 IST)
Killing a baby for second marriage कर्नाटकातील रायचूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसऱ्या लग्नात अडथळे आल्याने एका बापाने आपल्या 14 महिन्यांच्या मुलाची हत्या केली. मंगळवारी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
 
आरोपी वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली
आरोपी वडिलांनी पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. महंतेश (32) असे आरोपीचे नाव असून तो लिंगसुगुर तालुक्यातील कनसवी गावचा रहिवासी आहे. अभिनव असे मृत मुलाचे नाव आहे. आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याच्या पत्नीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध होते आणि त्यामुळेच त्याला पुन्हा लग्न करायचे होते.
 
लग्न करायचं होतं पण...
पुन्हा लग्न करू इच्छिणाऱ्या महांतेशसमोर आपले 14 महिन्यांचे मूल अडसर ठरत असल्याचे पाहून त्याने मुलाची हत्या करून मृतदेह गावातील छोट्या दगडाखाली लपवून ठेवला.
 
पोलिसांना तीन दिवसांनी मृतदेह सापडला
बेपत्ता झाल्याची नोंद केल्यानंतर पोलिसांनी महांतेशवर संशय घेऊन चौकशी केली. सुरुवातीला आरोपी वडील मुलाचा मृतदेह जाळल्याचे सांगून पोलिसांना चकमा देत राहिले. पण, घटनेनंतर तीन दिवसांनी त्याने मुलाचा मृतदेह लपवून ठेवल्याची जागा दाखवली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मुदगल पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments