पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता मध्ये हिरा चोरी झाल्याची घटना समोर आली आहे दोन चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून तब्बल 32 कॅरेटचा हिरा पळवून नेला असून हिराच्या मालकाने पोलिसात हिरा चोरी गेल्याची तक्रार केली.
हे प्रकरण 2002 चे आहे. लुटलेल्या हिऱ्याची किंमत 15 कोटी रुपये आहे. हा हिरा दरोडेखोरांनी जिन्याखाली मीटरच्या स्विच बोर्ड मध्ये लपवून ठेवला होता. या हिऱ्याच्या चोरीचा खटला जिल्हा न्यायालयात सुरु होता.
आता तब्बल 21 वर्षा नंतर या खटल्याचा निकाल लागला असून चोरट्यांना देखील पकडेल पण त्यांच्या जवळ हिरा काही सापडला नाही. आता हिरा सापडला असून न्यायाधीशांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली असून या संपूर्ण घटनेची तुलना त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या चित्रपट जय बाबा फेलुनाथ शी तुलना करत आहे. या क्लासिक चित्रपटात दुर्गा मूर्तीच्या सिंहाच्या तोंडात हिरा दडलेला होता
2002 मध्ये हा दरोडा पडला होता, जेव्हा हिऱ्याचा मालक दक्षिण कोलकाता येथील रहिवासी प्रणव कुमार रॉय त्याची किंमत जाणून घेण्यासाठी ज्वेलर्स शोधत होता. त्याच वर्षी जूनमध्ये हिरे दलाल इंद्रजित तापदार एका कथित ज्वेलरसोबत रॉय यांच्या घरी आला. रॉयच्या म्हणण्यानुसार, त्याने सोन्याच्या अंगठीतील हिऱ्याकडे ज्या प्रकारे पाहिले त्यामुळे त्याला त्या दोघांचा संशय आला आणि त्यानंतर रॉयने त्याला हिरा देण्यास सांगितले. यानंतर तापदारने पिस्तूल काढून हिरा दुसऱ्या साथीदाराला दिला. रॉयची तापदारशी बाचाबाची झाली, यादरम्यान तापदारच्या साथीदाराने रॉयवर उडी मारली आणि त्याला जमिनीवर चिटकले, त्यानंतर दोघे हिरा घेऊन पळून गेले.
या प्रकरणी हिरा व्यापाराने पोलिसांत तक्रार केली पोलिसांनी आरोपींना अटक केली. पण त्यांच्याकडे हिरा सापडला नाही. हिरा त्यांच्या घरातच असल्याचे पोलिसांना कळले होते.पण हिरा कुठेच सापडला नाही.
21 वर्षाच्या या खटल्यानंतर पोलिसांनी पुन्हा आरोपींच्या घराची तपासणी केल्यावर
पोलिसांना हिरा जिन्याखाली असलेल्या मीटरच्या स्विचबोर्डात सापडला. नंतर न्यायाधीशांनी हा हिरा त्याच्या मालकाला परत दिला. न्यायाधीशांनी या सम्पूर्ण प्रकरणाची तुलना सत्यजित रे च्या चित्रपट जॉय बाबा फेलुनाथशी केली आहे.