Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

‘क्यार’ वादळाचा धोका मासेमारी ठप्प तर थंडीत पाऊस

‘क्यार’ वादळाचा धोका मासेमारी ठप्प तर थंडीत पाऊस
, शनिवार, 26 ऑक्टोबर 2019 (10:20 IST)
मुंबईसह राज्यभरातील सर्वाना आता थंडीची प्रतीक्षा आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस थांबत नाहीये. तर दुसरीकडे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदूर्गात मुसळधार पाऊस सुरु आहे. सिंधुदूर्गातल्या कणकवलीत जोरदार पाऊस सुरू आहे. तर  कणकवलीसह देवगड, वैभववाडीतदेखील मुसळधार पावसाने पावसाने हजेरी लावली आहे. या कमी दाबाच्या पट्यामुळे पुढचे 24 तास कोकणात जबरदस्त पाऊस होणार आहे. सोबतच तसेच पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद आणि बीडमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडणार असून राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
 
हवामान खात्याने गुरुवारीच कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर ‘क्यार’ वादळाचा मोठा फटका बसणार असून, त्याबद्द्द्ल रहा असे सांगितले होते. दोन दिवसात हे वादळ दोन्ही किनारपट्ट्यांवर धडकणार असल्याचा अंदाज वर्तवतानाच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अतिवृष्टीचा इशाराही हवामान खात्याने वर्तवला होता तसे झाले सुद्धा .  काल अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला पावसाने झोडपले आहे. तर  मध्यरात्रीपासून किनारपट्टीवर जोराचे वारे आणि पाऊस सुरू असून मालवण मधल्या देवबाग भागात समुद्राच्या उधाणाचं पाणी भरलं आहे. त्यामुळे देवबाग येथे अनेक घरात पाणी शिरल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर राजकोट आचरा जामडूल भागातल्या वस्तीतही समुद्राच्या उधाणाचं पाणी भरलं आहे. मच्छीमारांच्या होड्यांच नुकसान झाल असून या भागात जोराचे वारे आणि पाउस सुरू आहेत. सिंधुदुर्गात कणकवली, देवगड आणि वैभववाडीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार, काहीही होऊ शकते - छगन भुजबळ