Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

उंदरांपासून पसरणारा Lassa ताप, त्याची लक्षणे काय जाणून घ्या

mouse
, मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (17:56 IST)
देशात आणि जगात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना आणखी एक धोक्याची चाहूल ऐकू येत आहे. यूके मधून येत असलेल्या ताज्या बातम्यांप्रमाणे लासा व्हायरसचे 3 रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. 11 फेब्रुवारीला यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. ही चिंतेची बाब आहे.

लासा तापाची ही प्रकरणे पश्चिम आफ्रिकन देशांच्या प्रवासाशी संबंधित असल्याचे दिसून येत आहेत. नायजेरियात लासा नावाचे एक ठिकाण असून या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता. यामुळे या तापाला लासा असे नाव पडले. लासा ताप याबद्दल जाणून घ्या-
 
लासा ताप म्हणजे काय-
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार लासा तापाशी संबंधित मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. आपण याला सुमारे एक टक्का म्हणू शकतो. तथापि काही रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले ज्यात विशेषतः गर्भवती महिलांमध्ये धोका जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

माहितीप्रमाणे सुमारे 80 टक्के प्रकरणे लक्षणे नसलेली असतात. यामुळे रोग शोधणे आणि उपचार करणे कठीण होते. काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असू शकते.
 
लासा ताप हा उंदरांद्वारे पसरतो
लासा तापाचा विषाणू पश्चिम आफ्रिकेत सापडला असून 1969 मध्ये पहिल्यांदा नायजेरियात लसाचा रुग्ण आढळला होता. नायजेरियातील दोन परिचारिकांच्या मृत्यूनंतर या आजाराचे निदान झाले असल्याचे कळते. लसाचा संसर्ग उंदरांपासून होतो असे सांगण्यात येत आहे. संक्रमित उंदराच्या मूत्र किंवा विष्ठ दूषित अन्न किंवा घरगुती वस्तूंच्या संपर्कात आल्यावर हा संसर्ग माणसांमध्ये पसरतो. नंतर हा आजार माणसापासून माणसात पसरू शकतो. बाधित रुग्णाच्या डोळे, नाक किंवा तोंडातून बाहेर पडणाऱ्या द्रवपदार्थाच्या संपर्कात आल्यास हा आजार पसरु शकतो. शिवाय इतर संपर्क जसे की मिठी मारणे, हात मिळवणे किंवा संक्रमित व्यक्तीच्या जवळ बसणे, या रोगाचा संसर्ग होण्याची चिन्हे अद्याप दिसून आलेली नाहीत.

लासा तापाची लक्षणे साधारणतः 1 ते 3 आठवड्यांनंतर दिसूून येतात. सौम्य लक्षणांमध्ये सौम्य ताप, थकवा, अशक्तपणा आणि डोकेदुखी जाणवतं. गंभीर लक्षणांमध्ये रक्तस्त्राव, श्वास घेण्यात अडचण, उलट्या, चेहर्‍यावर सूज येणे, छाती, पाठ आणि पोटदुखी हे लक्षणं दिसून येतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरच्या घरावर ईडीचे छापे