Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

जगातील सर्वात श्रीमंत तिरुपती मंदिराचं ४०० कोटींचं नुकसान, कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसा नाही

जगातील सर्वात श्रीमंत तिरुपती मंदिराचं ४०० कोटींचं नुकसान, कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसा नाही
, सोमवार, 11 मे 2020 (13:30 IST)
लॉकडाउनचा फटका सर्व प्रकाराच्या व्यवसायांसोबत मंदिरांनाही बसला आहे. सध्या सर्व मंदिर भक्तांसाठी बंद आहे. अशात जगातील सर्वात श्रीमंत विश्वस्त मंडळ असणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानसमोरही आर्थिक समस्या उभी राहिली आहे. लॉकडाउनमुळे मंदिराचं ४०० कोटींचं नुकसान झालं असून कर्मचार्‍यांचा पगार काढणं कठिण होऊन बसले आहे.
 
तिरुमला तिरुपती देवस्थानकडून श्री वेंकटेश्वर मंदिराचा संपूर्ण कारभार चालवला जात असून लॉकडाऊनमुळे मंडळासमोर रोख पैशाचां तुटवडा निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनमध्ये आतापर्यंत कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन तसंच इतर खर्च म्हणून ३०० कोटी खर्च करण्यात आले आहेत. मंडळाकडे सध्या आठ टन सोनं आणि १४ हजार कोटींचं फिक्स डिपॉझिट आहे. त्यांना हात न लावता रोख पैशांची समस्या कशी सोडवता येईल यावर विचार केला जात आहे.
 
हा काळ सोडला तर मंदिरात दिवसाला जवळपास एक लाख भाविक येत असतात. सणांच्या दिवसात ही गर्दी आणखी वाढते. अशात दर्शनाचे तिकीट, देणगी, प्रसाद सर्व काही बंद असल्यानेही मंदिराला आर्थिक फटका बसला आहे. तरी मंडळाकडून आरोग्य संस्थांना ४०० कोटींची मदत देण्यात आली आहे.
 
गेल्या ५० दिवसांपासून मंदिर बंद आहे तसेच देवस्थान आपल्या काही खर्चांसाठी बांधील आहे. एरव्ही महिन्याला २०० ते २२० कोटींचा महसूल मंदिराला मिळत होता परंतू सध्या काहीच मिळत नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यातील कंटेन्मेंट झोन 17 मे पर्यंत पूर्णपणे बंद