Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

New Army Chief: लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे पुढील लष्करप्रमुख असतील

Webdunia
सोमवार, 18 एप्रिल 2022 (19:45 IST)
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे पुढील लष्करप्रमुख असतील. त्यांची भारतीय लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. या पदावर पोहोचणारे ते पहिले अभियंता अधिकारी आहेत. मनोज मुकुंद नरवणे यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी होते. सध्या जनरल मनोज पांडे हे लष्कराचे उपप्रमुख आहेत. ते जनरल एमएम नरवणे यांची जागा घेतील जे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत.
 
संरक्षण अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, सरकारने लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. जनरल मनोज पांडे 1 मे रोजी 29 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचा 28 महिन्यांचा कार्यकाळ 30 एप्रिल रोजी पूर्ण होणार आहे. नॅशनल डिफेन्स अकादमीचे माजी विद्यार्थी, पांडे यांना डिसेंबर 1982 मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समध्ये नियुक्त करण्यात आले.
 
लेफ्टनंट जनरल पांडे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ पल्लनवाला सेक्टरमध्ये ऑपरेशन पराक्रम दरम्यान एका इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले. डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन पराक्रममध्ये पश्चिम सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि शस्त्रे तैनात करण्यात आली. या घटनेने भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर आले.
 
गेल्या तीन महिन्यांत काही लष्करी अधिकारी निवृत्त झाले, त्यामुळे लेफ्टनंट जनरल पांडे सेवाज्येष्ठतेत सर्वोच्च स्थानी आले. सध्या ते जनरल एमएम नरवणे यांच्यानंतरचे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. अलीकडेच लेफ्टनंट जनरल राज शुक्ला, लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती आणि आर्मी ट्रेनिंग कमांडचे लेफ्टनंट जनरल वायके निवृत्त झाले आहेत.
 
तसे, देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर, मुख्य संरक्षण प्रमुख पद अद्याप रिक्त आहे. पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) कोण असेल याबाबत निर्णय झालेला नाही.
 
8 डिसेंबर 2021 रोजी हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि अन्य 12 लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अलीकडेच, जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. जनरल रावत यांच्या मुली तारिणी आणि कीर्तिका यांना हा सन्मान मिळाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments