Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवाजी महाराजांची मूर्ती जेसीबी लावून पाडली

Webdunia
गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (15:48 IST)
मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात लागलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली. या घटनेमुळे शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. क्राँग्रेस सरकारवर हल्ला बोलत जनता रस्त्यावर उतरली आहे. दरम्यान, खासदार छत्रपती संभाजी राजेंनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या प्रकारावर खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. 
 
मध्य प्रदेश सरकारने जाणुबबुजून शिवाजींची मूर्ती हटवली असल्याचा आरोप होत आहे. संभाजी राजेंनी ट्विटवर म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती जेसीबी लावून पाडत असल्याचा व्हिडिओ पाहून मन हेलावून गेलं. मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारने आणि काँग्रेस अध्यक्षांनी त्याबाबत खुलासा करावा. जनआक्रोश एवढा आहे की, त्याची झळ काँग्रेसला बसल्याशिवाय राहणार नाही. संभाजी राजेंनी यात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना टॅग केले आहे.
 
मूर्ती काढावीच लागणार होती, तर त्याची पद्धत सन्मानजनक ही करता आली असती. असल्या क्रूर पद्धतीने हटवून तुम्ही नेमकं काय सिद्ध करू पाहत आहात? असे कृत्य छत्रपतींचा वंशज म्हणून कदापीही सहन करु शकत नाही. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
 
भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील या घटनेवर ट्विटरवरून निषेध नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्राचे गौरव आहेत आणि त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. तसेच सन्मानपूर्वक मार्गाने हा चौथरा हटवला आला असता परंतू मप्र सरकारला महापुरुषांचा अपमान करण्यात गर्व  वाटतो असा आरोप देखील केला. शिवाजी महाराजांचा अपमान शिवसेनेला सहन होईल का? असा प्रश्‍न देखील मांडला.
 
मोहगावाच्या चौकात शासकीय जमिनीवर परवानगी न घेता मूर्ती लावण्यात आली होती म्हणून प्रशासनाने 24 तासांत मूर्ती हटवून कारवाई केली असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले परंतू सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायल झाल्यामुळे अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. नंतर शिवप्रेमींनीही रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदवत  मोर्चा काढला. येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments