Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज म्हणाले - गाईचे शेण आणि गौमुत्राने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते

Webdunia
रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (11:46 IST)
गायीचे शेण आणि मूत्राचा वापर करून देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली जाऊ शकते, असे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केले आहे. भोपाळमध्ये भारतीय पशुवैद्यकीय संघटनेच्या महिला शाखेच्या अधिवेशनाला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. जर योग्य व्यवस्था यासाठी अवलंबविली तर गायी, तिचे शेण आणि मूत्र देश आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यास मदत करू शकते, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले
कार्यक्रमात उपस्थित पशुवैद्यकीय डॉक्टरांना संबोधित करताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, 'गाय/बैलाशिवाय काम चालू शकत नाही'. सरकारने गोशाळा बांधल्या, पण जोपर्यंत समाज जोडला जाणार नाही, तोपर्यंत सरकारी गोशाळाचा काही उपयोग नसणार . मध्य प्रदेशात ज्योत जागविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,  इच्छा असल्यास आपण गायीचे शेण आणि  गोमूत्रासह  स्वतःची अर्थव्यवस्था मजबूत करून देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतो. आपल्याला ते स्थापित करावे लागेल. 
<

#WATCH | Cows, their dung and urine can help strengthen the economy of the state and the country if a proper system is put in place," says Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan while addressing a convention of the women’s wing of Indian Veterinary Association in Bhopal pic.twitter.com/Mf2yvmYsf0

— ANI (@ANI) November 13, 2021 >गेल्या वर्षी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गाईचे दूध, शेण आणि गोमूत्र यांचा वापर निरोगी समाजासाठी आवश्यक असल्याचे सांगत त्याच्या वापरावर भर दिला होता.
 

संबंधित माहिती

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments