Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मध्य प्रदेशाचे महामहिम राज्यपाल टंडन यांचे निधन

madhya pradesh
, मंगळवार, 21 जुलै 2020 (09:17 IST)
मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. लालजी टंडन यांचा मुलगा आशुतोषने टि्वटरवरुन ही माहिती दिली. आज सकाळी ५.३० च्या सुमारास लालजी टंडन यांनी अखेरचा श्वास घेतला. लालजी टंडन यांच्यावर लखनऊच्या गुलाला घाट येथे आज सायंकाळी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती आशुतोष टंडन यांनी दिली.

लालजी टंडन यांना मागच्या आठवडयात लखनऊच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटिलेटरवर होते. अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची फुप्फुस, किडनी आणि लिव्हर व्यवस्थित काम करत नव्हते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोठी बातमी : ऑक्सफर्डची कोरोना व्हायरस विरोधातली लस आहे ‘द लॅन्सेट’