भोपाळ- 25 वर्षाच्या नवर्याच्या विचित्र सवयींमुळे त्रस्त पत्नीने भोपाळ कोर्टात घटस्फोटासाठी दिलेल्या तर्कामुळे हे प्रकरण चर्चेचा विषय झाला आहे. 1 वर्षापूर्वी विवाह करून संसार सुरू करणारी 23 वर्षीय तरुणीने म्हटले की मला घटस्फोट हवाय कारण माझा नवरा आठ-आठ दिवस अंघोळ करत नाही, शेविंग देखील करत नाही.
भोपाळ कुटुंब न्यायालयाची काउंसलर शैल अवस्थी यांनी सांगितले की या दंपतीने परस्पर संमतीने विवाह विच्छेदासाठी कुटुंब न्यायालय प्रकरण दाखल केले आहे. भोपाळ कुटुंब न्यायालयाचे न्यायाधीश आरएन चंद यांनी अलीकडेच दंपतीला निर्देश दिले आहे की त्यांना घटस्फोट हवा असल्यास पुढील सहा महिने वेगळं राहव लागेल. यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
या प्रकरणात महिलेचे म्हणणे आहे की इतक्या दिवस अंघोळ न केल्यामुळे तिच्या नवर्याच्या शरीरातून घाण वास येतो आणि अंघोळ करायला सांगितल्यास तो परफ्यूम लावून अंघोळ टाळण्याचा प्रयत्नात असतो.
हे प्रकरण एक महिना जुनं आहे आणि घटस्फोटाच निर्णय झाला आहे. एका वर्षापूर्वी झालेलं हे लग्न इंटरकास्ट परंतू अरेंज होतं. मुलगा सिंधी समाजाचा आहे तर मुलगी ब्राह्मण समाजाची. यांना मुलं-बाळ नाही आणि मुलगा बैरागढ येथे दुकान चालवतो.
महिलेने म्हटले की तिने नवर्याच्या समाजात, त्याच्या राहणी, खाण्याच्या सवयी अमलात आणण्याचा प्रयत्न केला परंतू ती त्या कुटुंबात आता ऍडजस्ट करू पात नाहीये.
मुलीचा आरोप आहे की घर अव्यवस्थित ठेवणे तसेच बचत न करणे यामुळे तिला भविष्याची काळजी नाही असे कळून येत असल्यामुळे तिला ऍडजस्ट करणे अवघड जातंय.