Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, मुसळधार पावसामुळे राजकोट विमानतळ टर्मिनल बाहेरचे छत कोसळले

rajkot news
, शनिवार, 29 जून 2024 (16:32 IST)
गुजरातमधील राजकोट विमानतळावर आज दुपारी एक मोठा अपघात झाला. मुसळधार पावसामुळे राजकोट विमानतळाच्या छताचा काही भाग कोसळून खाली पडला. विमानतळ टर्मिनलच्या बाहेर पॅसेंजर पिकअप आणि ड्रॉप एरियामध्ये छत पडल्याचे सांगण्यात येत आहे. ते जुलै 2023 मध्ये लाँच करण्यात आले. सुदैवाने या वेळी कोणी तिथे उपस्थित नव्हते .अन्यथा दिल्लीसारखी दुर्घटना घडू शकली असती.
 
नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणी साचलेल्या छताचा निचरा करण्यासाठी देखभालीच्या कामात ते कोसळले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.राजकोट विमानतळावर दुरुस्तीचे काम सुरू आहे.
 
या पूर्वी दिल्ली विमानतळावर टर्मिनल 1 चे छत कोसळून एकाचा मृत्यू झाला आणि सहा जण गंभीर जखमी झाले. या अपघातात अनेक वाहनांचे नुकसान झाले. 

तर गुरुवारी मुसळधार पावसामुळे जबलपूर विमानतळाचे छत कोसळले. या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, जबलपूरमध्ये 450 कोटी रुपयांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या डुमना विमानतळाचे छत पहिल्याच पावसामुळे कोसळले. मोदीजींनी तीन महिन्यांपूर्वी या विमानतळाचे उदघाटन केले होते. 

 Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लडाखमध्ये टॅंक सराव करताना मोठी दुर्घटना, पाण्याची पातळी वाढली, पाच जवानांचा बुडून मृत्यू