Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काही आठवड्यात तुमच्यासोबत असेन : पर्रिकर

Webdunia
सोमवार, 14 मे 2018 (08:34 IST)
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपण सुखरुप असून आपल्यावरील उपचार यशस्वी होत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. “माझ्यावर सुरु असलेले उपचार यशस्वी होत असून, मी काही आठवड्यात तुमच्यासोबत असेन”, असं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे.  गोव्यात भाजपचं कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनात मनोहर पर्रिकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या मनोहर पर्रिकर यांच्यावर सध्या अमेरिकेत उपचार सुरु आहेत. 

https://twitter.com/manoharparrikar/status/995649396367736833

दरम्यान, या संमेलनात भाजपाध्यक्ष अमित शाह यांनीही भाजप कार्यंकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मनोहर पर्रिकर यांनी सर्जिकल स्ट्राईक करुन देशाची जगात वेगळी ओळख निर्माण करुन दिल्याचंही शाह म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments