Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पर्रिकर पणजीत परतले, अफवांना पूर्णविराम

manohar parikar goa cashless state
, शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018 (09:27 IST)
वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला गेलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गुरुवारी संध्याकाळी पणजीत परतले. त्यामुळे या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. याआधी  गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेचे जोरदार वारे वाहत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत हे भाजपमध्ये परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. सरकार पडण्याच्या अफवांमुळेच पर्रिकर अमेरिकेहून दोन दिवस अगोदरच गोव्यात दाखल झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या चर्चेला काही अर्थ नसल्याचे भाजपच्या नेत्यांनी सांगितले. 
 
गेल्या काही महिन्यांपासून वैद्यकीय उपचारांमुळे पर्रिकर स्थानिक राजकारणापासून पूर्णपणे तुटले आहेत. सुरुवातीला मुंबईत उपचार घेतल्यानंतर पर्रिकर अमेरिकेत उपचारांसाठी गेले होते. जून महिन्यात ते भारतात परतले होते. मात्र, त्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांना उपचारांसाठी अमेरिकेला जावे लागले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंग्यांचे डोळे निश्चित करतात शिकारीची वेळ