जयपूर, नागपूर, गोव्यासह देशातील अनेक विमानतळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली आहे. हे ईमेल सोमवारी प्राप्त झाले. नागपूर विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास धमकीचा ईमेल आला. विमानतळ संचालकाच्या मेल आयडीवर हा ईमेल आला होता. विमानतळाच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. या धमकीच्या ईमेलची तक्रार विमानतळ प्रशासनाने नागपुरातील सोनेगाव पोलीस ठाण्यात केली आहे. विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
हा बनावट ईमेल असल्याचा पोलिसांना संशय असून अधिका-यांनी सांगितले की ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे बनावट ईमेल असून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पाठवण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी, कोलकातासह देशातील अनेक विमानतळांवर अशाच प्रकारचे ईमेल आले होते, जे नंतर बनावट असल्याचे निष्पन्न झाले.