rashifal-2026

गर्भपाताची परवानगीसाठी कोर्टात पोहचली अल्पवयीन बलात्कारातून गर्भवती

Webdunia
16 वर्षीय बलात्काराला बळी पडलेल्या मुलीने दिल्ली उच्च न्यायालयाचे दार ठोठावून आपल्या गर्भपात करण्यास परवानगी मागितली आहे. कोर्टाने म्हटले की अल्पवयीन मुलीची शारीरिक व मानसिक उपचारात्मक तपासणी केल्या जाण्याची गरज आहे.
 
अल्पवयीन मुलीने केलेल्या अर्जाप्रमाणे एका विवाहित व्यक्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध स्थापित केले, ज्यामुळे ती गर्भवती झाली. न्यायमूर्ती विभा बाखरू यांच्याप्रमाणे मुलगी निराश दिसत होती व वारंवार गर्भपात करण्याची मागणी करत होती.
 
कोर्टाने एका शासकीय रुग्णालयातील चिकित्सा अधीक्षकांना मेडिकल बोर्डाचे गठन करण्याचे निर्देश दिले आहे. त्यात एक एक महिला रोग विशेषज्ञ आणि एक मनोचिकित्सक असल्याचे निर्देश आहेत.
 
चिकित्सकीय गर्भपात (एमटीपी) कायद्यानुसार 20 आठवड्याचा गर्भ काढणे प्रतिबंधित आहे. परंतू अशा प्रकरणात गर्भधारणामुळे आई किंवा बाळाच्या जीवनाला धोका असल्यास कोर्ट निर्णय घेऊ शकते.
 
20 वर्षीय विवाहित व्यक्तीने त्याच्या घटस्फोट झाला असून आता आपण पती-पत्नी आहोत असे म्हणत संबंध ठेवले आणि त्यामुळे गर्भधारणा झाल्याचे मुलीने स्पष्ट केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments