यावेळी मोहन भागवत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कशालाही असंभव मानत नाहीत. अशक्य ते शक्य करुन दाखवतात. मोदींचं नेतृत्व हे भारतासाठी आशेचं किरण आहे”. तर अमित शाहा म्हणाले, “मोदी सरकार सत्तेत येण्याआधी त्यांच्यावर परराष्ट्र निती सांभाळता येणार नाही अशी टीका झाली. मात्र आज मोदी सरकारचे सगळ्या देशांशी चांगले संबंध आहेत”.