सुमारे एक आठवडा लांबलेला मान्सून अखेर करळमध्ये दाखल झाला आहे. ही माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मान्सूनने जमीनीवर आल्यानंतर त्याची वाटचाल वेगाने होत असल्याचे हवामान विभागाने सांगितले होते.
दरवर्षी 7 ते 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होणारा मान्सून यंदा एक आठवडाभर उशिराने दाखल होण्याची शक्यता आहे. आता पुढील आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबईत 13 जूननंतरच मान्सूनचे आगमम होर्याची शक्यता वर्तवली जात आहे.
13 ते 15 जून दरम्याम मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल तसेच 10 जूननंतर कोकणात पाऊस पडेल. मात्र २० जूनपर्यंत अंतर्भागात आणि किनारपट्टीवरही पाऊस सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
मात्र 28 जूननंतर पावसाचा सर्वदूर संचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.