Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आजपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Webdunia
गुरूवार, 8 जुलै 2021 (11:02 IST)
पुणे- शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात मान्सून काहीसा मंदावला आहे परंतु आता सुमारे दोन आठवड्यानंतर मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. 8 जुलै नंतर संपूर्ण देशात मान्सून पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसह देशात मान्सून वापसीचे संकेत मिळत आहेत.
 
पुढील काही दिवस राज्यात पावसाची स्थिती असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. गुरूवारपासून राज्यात सर्वत्र पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून येत्या रविवारपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याचे संकेतही भारतीय हवामान विभागाने दिले आहेत.
 
पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळणार असून कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या दिवसांत राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. याठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
 
दरम्यानच्या काळात केवळ बिहार राज्य वगळता अन्य राज्यात पावसानं दडी मारली आहे. मात्र आता 8 जुलै नंतर संपूर्ण देशात मान्सून पुन्हा सक्रीय होईल, या अंदाजामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments