Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मप्र: मृत शेतकर्‍याच्या कुटुंबीयांना 1 कोटी

Madhya pradesh
, गुरूवार, 15 जून 2017 (10:44 IST)
मंदसोर- मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना 1 कोटीची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सरकारने दिले होते. त्यानुसार, बदवान गावातील घनश्याम धाकड या शेतकर्‍याच्या कुटुंबीयांकडे मुख्यमंत्री चौहान यांनी 1 कोटीचा धनादेश सुपुर्द केला.
 
चौहान हे पत्नी साधना यांच्यासोबत विशेष विमानाने बदवान गावात पोहोचले. त्यांनी धाकड कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे 1 कोटीचा धनादेश सुपुर्द केला. शेतकर्‍यांवर गोळीबार करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही चौहान यांनी त्यांना दिले. दरम्यान, चौहान  हे लोध, नायखेडा, पपळ्यामंडी, बारखेडा पंथ आणि बुधा या गावांतील शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

16 जूनपासून पेट्रोल पंप चालकांनी पुकारलेला संप मागे